पेरुमल मुरुगन यांचं पुनरागमन (उत्तरार्ध)
मुरुगन यांच्या स्वभावात एक स्वतंत्र, सर्जनशील छटा नेहमीच होती. ते म्हणतात, “मला एकट्याला राहायला आवडायचं. त्यामुळे माझं निरीक्षण तीव्र होतं. वयाच्या आठव्या वर्षापासूनच मला लिहावंसं वाटू लागलं होतं. जातीजातीत फरक का आहे असे प्रश्न मला नेहमीच पडायचे. वडिलांच्या दुकानात काम करणाऱ्या मुलांशी तिथली गिऱ्हाईकं कशी वागायची, ते मी दुकानात बसून न्याहाळत असे. आमच्या शेतावर काम करणाऱ्यांशी आमचं नातं कसं होतं हे मला जाणवायच.......